जवळची ओळखीची व्यक्तीच विश्वासघात करतांना आढळून येते


 जवळची ओळखीची व्यक्तीच विश्वासघात करतांना आढळून येते


काळा जादू आणि गुन्ह्या मध्ये आरोपी हा जास्तीत जास्त वेळा ओळखीचा असतो. पोलीस जेव्हा गुन्ह्याचा तपास करता तेव्हा अनेकदा गुन्हेगार हा ओळखीचा निघतो.


काळा जादू करायला व्यक्तीची कुठलीही वस्तू किंवा शरीराचा कुठलाही भाग लागतो जसे कि केस देखील चालतात. गुन्ह्या मध्ये व्यक्तीला जो गुन्हा करायचा असतो त्याच्या बद्दल संपूर्ण माहिती असते आणि हे सर्व ओळखीचे असल्याशिवाय शक्य नाही.


मी इथे कुठलाही प्रचार प्रसार करत नाही तर ज्या व्यक्तींनी अनुभव शेअर केले आहेत त्या नुसार बोलत आहे.


नवी मुंबई मध्ये चांगला व्यवसाय सुरु होता, एक व्यक्ती संपर्कात आला, तो हळू हळू घरचा झाला, मी हे फक्त एकच सांगत आहेत अशी अनेक प्रकरणे भारत काय जग भरात घडत असतात, मनुष्य प्राणी सगळीकडे एकसारखाच आहे. नवऱ्याचा व्यवसाय ताब्यात घेतला, त्याला देव धर्म कर्म कांड चा खोटा नाद लावला व घराबाहेर यात्रा करायला लावले.


बायकोशी जवळीक केली कारण तो घरीच राहत होता म्हणजे असे केले कि त्याच्या शिवाय त्या व्यक्तीच्या कुटुंबाला कुणाचा सहारा नको असायला. चांगली हुशार मुलगी तिला व्यसनी बनवले. 


हे सर्व सोपे नव्हते पण शक्य कसे झाले?


कारण ती व्यक्ती घरी असायची, सातत्य आपोआप च होत गेले. चांगली लोक कधी वाईट विचार करत नाही तर धूर्त व्यक्ती धूर्तपणा मनात ठेवून वागत असते त्यामुळे ते कुटुंब धूर्त व्यक्तीच्या जाळ्यात अडकले.


म्हणून गुरु किंवा मानसोपचार समुपदेशकाच्या संपर्कात रहायचे आणि चांगले रहा पण त्या चांगुलपणाने आंधळे नका बनू कोल्हा कितीही काहीही केला तरी तो कोल्हाच राहील.


हे सर्व त्याच्या नात्यातील व्यक्तीने सांगितले. झाले बरबाद कुटुंब व ती धूर्त व्यक्ती मजेत आयुष्य जगत आहे. इथे काहीही शिक्षा मिळत नाही अनेक धूर्त वाईट लोक चांगले आयुष्य जगतांना बघितले आहे हा पण फक्त तोंडाच्या वाफा ऐकल्या कि ह्याची मुले बिघडतात वगैरे असे काही आढळून आले नाही, पुण्याचे पोर्शे प्रकरण बघा, मुंबई मध्ये असे ५० प्रकरणे दाखवेल. कोणीही काहीही करू शकत नाही.


दुसरीकडे एक व्यक्ती मोठ्या पदावर, तिला फसवण्यासाठी सह कर्मचारी काळा जादू चा वापर करते, त्या मोठ्या ऑफिसर ची बायको विचित्र वागू लागते, लहान मुले सतत आजारी पडतात, जेव्हा घटस्फोट होतो, नवरा मुलांची कस्टडी मागत नाही आणि बायकोला देतो त्यानंतर काही महिन्यांनी जेव्हा ह्या समस्येचे मूळ समजते तो पर्यंत उशीर होवून जातो.


एका नातेवाईकाची प्रगती बघवत नाही व त्यावर कुठली तरी क्रिया करून त्यांची पूर्ण समृद्धी काढून टाकतात, हे देखील समजायला उशीर होते.


थोडक्यात सांगायचे झाल्यास जवळच्या लोकांचे खूप वाईट वागणे बघितले आहे. एक केस अशी आली होती जिथे लहानपणी नात्यातील व्यक्तीने मुलाचे लैंगिक शोषण केले होते आणि आई वडील मुलाला शांत बस बोलले मग मी इथे अजून मुलींबद्दल बोलत नाही कारण अनेक गुन्हे उघडकीस येत नाही पण मोठ्यापणी जेव्हा समुपदेशन करतात तेव्हा त्यांची जखम किती खोल आहे हे समजते.


पोलीस स्टेशन मध्ये तर सर्व प्रकारचे गुन्हे वास्तवात घडलेले दिसून येतात, पोलीस बनणे इतके सोपे नाही. टीव्ही सिनेमा नेटफ्लिक्स आणि पोर्न वास्तवात घडलेले दिसून आले आहे.


तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला सुरक्षित आयुष्य जगायचे असल्यास गुरूंच्या मार्गदर्शनाखाली रहा, खूप मोठ्या संकटातून वाचू शकता आणि जर स्वभाव चांगला असेल तर तुम्हाला गुरु दीक्षा घ्यावीच लागेल, ह्याला दुसरा पर्याय नाही.


गुरु किंवा मानसोपचार समुपदेशक का महत्वाचे आहे? दोन सोप्या उदाहरणाने सांगतो.


एक व्यक्ती देव भोळी, अशीच काही एक समस्या आली आणि उपायाला सुरुवात केली, एक ढोंगी बाबा भेटला, त्याने पैसे काढले, त्याने दुसर्‍याला देखील सांगितले असे करत करत लाखो रुपये उकळले गेले. इथे एकच दुवा होता तो एका ओळखीच्या व्यक्तीने ह्या ढोंगी बाबाचा संपर्क करून दिला होता व त्याला सुद्धा हिस्सा मिळत होता.

एक मुलगी, स्वभावाने भावनिक, चुलत्याला माहिती होते कारण लहानाचे मोठे एकत्र झाले. कॉलेज ला गेल्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले, व मित्रांना सुद्धा त्या मुलीच्या स्वभावाचा कच्चा दुवा इतर मित्रांना सांगितला. कॉलेज संपेपर्यंत अनेक रिलेशन्स झाले व लग्नाला आता समस्या येत आहे.


जितके आपण प्रोफेशनल मदत घेतो तितका आपला गैर फायदा कमी उचलला जातो आणि जे प्रोफेशनल मधून संबंध बनतात तिथे एक मर्यादा देखील असते.


सर्वांना योग्य वेळी थोडे मार्गदर्शन किंवा उपाय पाहिजे होते तर आज त्यांचे भविष्य उज्वल असले असते. आयुष्य असेच आहे.


हा माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा लेख आहे आणि बरे झाले ते लीलावती प्रकरण बाहेर आले त्यामुळे लोकांना थोडे बोलता तरी आले, कारण अनेक कमेंट मध्ये त्यांच्या सोबत असे झाले वाचण्यात आले आणि माझ्याकडे सर्व विषय ओपन आहे तुम्ही इथे बिनधास्त व्यक्त होऊ शकता, इथे कोणीही तुम्हाला जज करणार नाही.


आपले ऑनलाईन कन्सल्ट उपलब्ध आहे, तुम्हाला भावना दाबून आयुष्य जगण्याची गरज नाही, ज्या काही समस्या असेल त्यावर तुम्हाला खात्रीशीर उपाय मिळेल, सर्व माहिती गुप्त ठेवली जाते. जर भावना दाबून राहिल्या तर त्यांच्या तुमच्या आयुष्यावर आरोग्यावर प्रचंड वाईट परिणाम होतो त्यामुळे व्यक्त व्हा आणि मुक्त व्हा. माझा मोबाईल क्रमांक खाली देत आहे.


धन्यवाद


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग

८०८०२१८७९७


Image by Tracy Lundgren from Pixabay

Comments