कालच्या पोस्ट ला भरभरून प्रतिसाद आला, लाईक बद्दल नाही बोलत आहे तर मेसेज आणि कॉल द्वारे, ती पोस्ट व्हास्टएप ग्रुप च्या सदस्यांनी योग्य लोकांपर्यंत पोहचवली आणि अनेकांना पहिल्याच कन्सल्ट समुपदेशनामध्ये प्रचंड बदल जाणवला. खाजगी विषय आपल्या वाटतात ते खाजगी आहेत पण तुमच्यासारख्या समस्यांनी अनेक लोक ग्रस्त असतात त्यामुळे पहिले व्यक्त होणे खूप महत्वाचे असते आणि इथूनच समस्या कायमस्वरूपी दूर होवून जाते. जर तुम्ही सुरुवाती पासून काही न लपवता सर्व सांगितले तर आरामात पहिल्याच सेटिंग मध्ये मार्ग निघतो, आणि जर समस्या जुनी असेल तर जास्त सेटिंग्स घ्याव्या लागतात.
२०, ३० वर्ष जुन्या समस्या पूर्ण काढून टाकल्या गेल्या, इतकी वर्षे तुम्ही त्या समस्या का कवटाळून बसले? फक्त एका दिवसात मार्ग निघाला का नाही? निसर्ग सतत बदलत असतो तसे तुम्ही बदलला सामोरे जा, घाबरू नका, तुमचे आयुष्य बदलून जाईल.
मदत घेणे कमजोरपणाचे नाही तर समजूतदारपणाचे लक्षण आहे.
व्यक्त व्हा मुक्त व्हा, मनातील सर्व कचरा काढून टाका, सर्व नकारात्मक विचार घटना काढून टाका. इतक्या छोट्या स्टेप्स ने तुम्ही तुमचे आयुष्य बदलून टाकता.
२० वर्षांपूर्वीची फक्त एक आणि एकच घटना काढून टाकली व त्या व्यक्तीचा आज फोन आला होता कि ह्या २० वर्षात पहिल्यांदा मी गाढ झोपलो, मनात कुठलेही विचार आले नाही, शरीरात नाव चैतन्य निर्माण झाले, उज्वल भविष्याची स्वप्ने पडू लागली, काल मी एक मौल्यवान अनुभव घेतला. विचार करा किती फरक पडतो ते.
तुम्हाला एक पाऊल पुढे टाकावेच लागेल त्याशिवाय काहीही होणार नाही.
अश्विनीकुमार
समुपदेशन, संमोहन उपचार
८०८०२१८७९७
Image by Briam Cute from Pixabay

Comments
Post a Comment