आमच्या परिचयातील म्हणजे ते आता घरातील एक सदस्य आहे त्यांचा फोन आला होता. त्यांना काही वर्षांपासून ओळखतो पण त्या अगोदर पासून ते हीलर जे संपर्कात येईल त्यांचे हिलिंग करत असत, आणि जास्तीत जास्त टाईम हे बघितले कि त्यांचे रुग्ण हे मोठ मोठे ऑफिसर्स होते, पैश्यांसाठी एका ठिकाणी काम करतात तिथून पगार मिळतो व बाकी टाईम त्यांना तिथून सुट्टी देखील मिळते.
आता कल्पना करा तुम्ही आम्ही मुंबई पुण्या सारख्या ठिकाणी राहतो तिथे आपण अनेकदा आपल्या अंतर्मनाची शक्ती वापरतो किंवा इतर कुठलीही अद्भुत शक्ती जी तुम्ही जागृत केली असते ते, ह्यामध्ये तुमचे आयुष्य जगतांना काहीच अडचण येत नाही आणि हि शक्ती विनाकारण वापरली जात नाही तर जेव्हा गरज असते तेव्हा वापरली जाते.
उदाहरणार्थ जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्यासाठी आपोआप रस्ता खुला होत जातो, कुठेही अडथळा येत नाही. आपल्याला जे पाहिजे ते आपल्याकडे आपोआप येते, जर दुसर्याकडे असेल ते देखील येते, कामजोरांकडे असेल ते देखील येते, ब्रम्हांड, अध्यामिक, अलौकिक आणि अघोरी शक्तीशी सरळ संपर्कात असतो त्यामुळे हे पृथ्वीवरील जीवन अतिशय सोपे वाटते. म्हणजे पाहिजे ते करू शकतो तसे.
आणि हि शक्ती नकळत जागृत होते ना कि ठरवून, तुम्हाला फक्त कृती करायची आहे बाकी काही नाही. आणि ह्या सिद्धीसाठी लागते अनेक वर्षांची साधना जी ३, ४ दिवसांच्या कोर्से ने नाही तर अनेक वर्षांच्या अथक परिश्रमाने, सातत्याने आणि गुरूंच्या मार्गदर्शनाने प्राप्त होते. फक्त २ % जन्मजात आणि भाग्यशाली जन्माला येतात पण जास्तीत जास्त ९८ % मध्ये अनेक लोक हि शक्ती जागृत करू शकतात ती अथक परिश्रमाने आणि सातत्याने.
माझ्या परिचयाची व्यक्ती गेली होती कुंभ मेळ्यात, जिथे अद्भुत शक्तींचा महापुर असतो तिथे, तिथे करोडो लोक येत जात असतात अश्या ठिकाणी बोलत आहे. तिथे दर्शनाला जाताना जास्त लाईन मिळाली नाही आणि आरामात दर्शन झाले, प्रसाद घेतांना सहज एक लहान मुलाने हात पुढे केला आणि त्याला प्रसाद दिला त्या नंतर अनेकांनी हात पुढे केले व थोडा वेळ प्रसाद वाटण्यात गेला आणि असे बाकीच्या ठिकाणी झाले.
पुढे जावून एक जटाधारी शक्तिशाली सिद्ध पुरुष दिसला व ते एकत्र स्टेशन ला जायला निघाले. सर्व लोक बघत होती अनेक आशीर्वाद घेत होते म्हणजे एका शक्तीच्या पावर हाउस ला दुसर्या शक्तीचे पावर हाउस मिळाले होते. अनेक चमत्कारी चर्चा झाल्या त्या इथे देत नाही कारण त्या त्यांच्या खाजगी होत्या.
हे सर्व नकळत झालेले आहे आणि हीच अवस्था जागृत असते. काही ठरवून नाही आणि नाही काही ट्रिक. आणि असेच अनुभव मी माझ्या शिष्यांकडून ऐकत असतो आणि जे अनुभव असतात न ते बोलतांना देखील आश्चर्यचकित झालेले असतात. एक वेगळ्या फ्लो ने ते सांगत असतात, काहीही आठवावे लागत नाही, नाही तर स्टोर्या लगेच समजून येतात. तुम्ही एकदा अनुभव घेवून आश्चर्यचकित झालेले किंवा घाबरलेले असतील त्यांचे बोलणे ऐकले तर तुम्हाला समजून जाईल व नंतर जर कोणी खोटे अनुभव शेअर करत असेल तर लगेच तुम्हाला समजून येईल.
दररोज न चुकत सराव, साधना, तंत्र, मंत्र करा, रिच्युअल फोलोव करा मग बघा कसा चमत्कार घडतो ते, १२ वर्षे सिद्धी प्राप्ती साठी वाट बघायची गरज नाही तर तुमचे आयुष्याच चमत्कारिक झाले असेल. सामान्यतः लोक धीर धरत नाही तो तुम्ही धरा मग बघा चमत्काराला सुरुवात कशी होते ते. सातत्य, कठीण परिश्रम आणि धीर धरण्याला दुसरा पर्याय नाही आणि ज्यांच्या आवडीचे असते त्यांना काहीही फरक पडत नाही. आवड निर्माण करा, पुढे सर्वकाही सोपे होऊन जाईल.
आणि जे आपल्या आजूबाजूला पावर फुल लोक आहेत त्यांना महत्व द्या. जर तुमचे ध्येय शास्त्रात पारंगत व्हायचे असेल तर ठीक नाहीतर सामान्य ध्यान जरी केले तरी आहे ते आयुष्य देखील तुम्ही सुख समाधानाने जगाल पण सकारात्मक प्रगतीच्या दिशेने प्रवास करणे थांबवू नका.
तुम्ही साधना करा किंवा काम करा पण असे सातत्य ठेवा कि अनेक वर्षांनी तुमची साधना आणि काम सिध्द झाले पाहिजे.
जर आपले काही अनुभव असतील तर ते शेअर कराल. कुठल्याही अनैसर्गिक अलौकिक अनुभवाबद्दल कन्सल्ट करायचे असल्या संपर्क कराल.
अश्विनीकुमार
ग्रांड मास्टर रेकी हीलर आणि ऊर्जा स्पेशालीस्ट
८०८०२१८७९७

Comments
Post a Comment