हे खरं आहे की आपल्या अंतर्मनाची शक्ती खूप मोठी आहे! एकदा का आपण एखादा विचार आपल्या अंतर्मनात रुजवला की तो प्रत्यक्षात येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
तुम्हाला काय हवंय? 🤔
- उत्तम आरोग्य? 🩺
- भरपूर पैसा? 💰
- पसंतीची नोकरी किंवा बढती? 💼
- परदेशात स्थायिक व्हायचंय? ✈️
- उद्योग-व्यवसायात भरभराट? 📈
- शेअर बाजारात प्रचंड नफा? 📊
- शिक्षणात प्रगती? 📚
- आदर्श जोडीदार? ❤️
- सर्वांगीण समृद्ध आयुष्य? 🌟
- तुमच्याकडे जे नाही ते हवंय? ✨
जे तुम्हाला हवंय, ते नक्की मिळेल! फक्त तुम्हाला तो विचार तुमच्या अंतर्मनात रुजवायचा आहे. जर तुम्ही याच क्षणी तो विचार रुजवला, तर याच क्षणी तुम्हाला जे हवंय ते मिळेल.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा: तुम्हाला जे हवंय ते मनापासून मागा, त्यात कोणताही किंतु-परंतु नसावा, अगदी स्पष्ट! जो स्पष्टपणे मागेल त्यालाच ते मिळेल. निसर्गाचा नियम सोपा आहे: जो शक्तिशाली असतो, तो सर्वकाही स्वतःकडे खेचून घेतो.
हे खूप सोपं आहे. तुम्हाला नैसर्गिकरित्या सर्वकाही मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक युक्ती सांगतो:
- झोपण्यापूर्वी तुम्हाला जे हवंय ते स्पष्टपणे मागा. 🌙
- एका वेळी फक्त एकच गोष्ट मागा. 🎯
जर तुम्ही त्या २% लोकांमध्ये असाल, तर तुम्हाला हवं असलेलं त्याच क्षणी मिळेल. जर नसाल, तर काही दिवस वाट बघावी लागेल, त्यानंतर तुम्हाला ते नक्की मिळेल.
आपण इथे फक्त झोपेचा वापर करत आहोत, कारण झोप ही एक नैसर्गिक ध्यानधारणा आहे. जे सोपं आहे ते सोसंच राहू द्या, विनाकारण कुठेही कठीण परिश्रम करण्याची गरज नाही.
तुमच्या कल्पनांना मर्यादा घालू नका. इतरांना सर्वकाही मिळतंय आणि मला नाही, या विचारातून बाहेर पडा आणि स्वतःला महत्त्व द्या. तुम्ही देखील या सगळ्याचे हकदार आहात! जेव्हा तुम्ही कमजोर होता, तेव्हा तुम्हाला काही मिळत नव्हते आणि दुसरे तुमच्याकडील गोष्टी घेऊन जात होते. पण तो तुमचा इतिहास झाला आहे. जर इतिहास नसेल झाला, तर आता नवीन सुरुवात करा आणि तो इतिहास बदलून टाका!
हे सोपं आहे.
समजा ३ महिन्यांत काहीच नाही झालं, तर यावर सर्वात उत्तम शास्त्र म्हणजे संमोहन शास्त्र. तुम्ही इथे आहात आणि मी पण इथेच आहे, मग आधी स्वतःहून प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?
बिंधास्त प्रयत्न करा, तुम्ही हे करू शकता! लाचारी सोडा आणि धाडसी बना. धाडसी बनणे म्हणजे तुम्हाला जे हवंय ते मिळवण्याच्या दिशेने जाणं. मग वाघाच्या जबड्यातील शिकार देखील घेऊन येण्याचा प्रयत्न करा; भले जीव गेला तरी चालेल, पण मरताना पश्चात्ताप नसेल की तुम्ही प्रयत्न केला नाही.
फक्त २% लोकच इतकं धाडस दाखवू शकतात आणि धाडसी लोक अमर आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे, जो इतकं मोठं धाडस दाखवतो, तो नेहमीच यशस्वी होतो. "डर के आगे जीत है" ही केवळ म्हण नाही, ती एक कृती आहे! वाघाच्या जबड्यातून शिकार घेऊन येणारे प्रत्येकजण जिवंत आहेत आणि प्रचंड यशस्वी आहेत.
संमोहन तज्ञ
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

Comments
Post a Comment