✦ भारती एअरटेल हे शेअर २०२१ साली मी ५२० रुपये असतांना घ्यायला सुरू केले होते.
✦ एसबीआय हे शेअर २०२१ साली मी २८० रुपये असतांना घ्यायला सुरू केले होते.
✦ बायोटेक शेअर २०२१ साली मी ३०५ रुपये असतांना घ्यायला सुरू केले होते.
✦ व्ही आय शेअर मी २०२१ साली ९ रुपये असतांना घ्यायला सुरू केले होते.
✦ सन फार्मा मी २०२१ साली ६५४ रुपये असतांना घ्यायला सरू केले होते.
एक मित्र ज्याचा मित्र हा मारवाडी समाजातून येतो आणि त्यांचा ट्रेडिंग चा व्यवसाय, संबंध चांगले, त्या मित्राने माझ्या मित्राला सांगीतले कि अदाणी पावर चे शेअर विकत घे, २०२१ साली किंमत ९५ रुपये होती आणि शेअर्स घेतले. इथे वरील सारखे काही माझी स्वतःची गुंतवणूक पद्धती नव्हती तर एक टीप भेटी म्हणून पैसे जास्त टाकले.
माझे विद्यार्थी ज्यांना मी आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन आणि ध्यान शिकवले, समुपदेशन केले उपचार केल त्यापैकी काही जे गुंतवणूकदार होते ते अश्या टिप्स द्यायचे कि शेअर चे भाव गगनाला भिडलेच पाहिजे पण जर माझा व्यवसाय हा प्रायव्हसी वर अवलंबून आहे, आणि मी त्यांच्या टिप्स चा वापर करू नाही शकत कारण त्यांनी त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीने, पैसे गुंतवणूक करून नफा तोटा सहन करत ज्ञान, पैसा आणि अनुभव कमावला आहे तो मी घेऊ नाही शकत. हा पण पर्सेंटेज वर काम केले असते, नफा तोटा वाटून घेतला असता. नातेसंबंध चांगले पण व्यवहार तिथे व्यवहार.
हे स्वत: ठरवून घेतलेले निर्णय आहे. जबाबदारी माझी आणि तोटा सहन करण्यास काहीही समस्या नाही. जर तुम्हाला नुसता नफा पाहिजे असेल तर तुमच्यासाठी कुठलेही आर्थिक क्षेत्र नाही. उद्या काय होणार हेच माहिती नाही तर इतक्या पुढचे कसे काय दिसणार? जे यशस्वी गुंतवणूकदार आहे त्यांना विचार कि त्यांनी इतक्या वर्षात किती तोटा सहन केला ते, किती वर्षे यशाची वाट बघितली. ह्यामध्ये चांगल्या आणि वाईट मार्गाने यशस्वी होणारे दोन्हीही आहे. फक्त कम्प्युटर मागे नाही तर अनेकदा त्यांना प्रत्यक्ष कंपनीत व्हीझीट द्यावी लागते.
मी एक सोपा मार्ग वापरला जे सर्व शेअर तज्ञ मोफत मध्ये टीव्ही वर सांगत होते, तेव्हा ते इतके सोशल मिडिया वर ऍक्टिव्ह नव्हते. ते सर्व सांगायचे कि जास्त विचार करायची गरज नाही, ज्या बघण्यात आणि मुख्य कंपन्या आहेत त्याच घ्याल, तुम्हाला ज्ञान आणी अनुभव नसेल तर विनाकारण कुठल्याही कंपन्यांचे शेअर घ्यायला सुरुवात करू नका. वरील कंपन्या बघा सर्व माहिती मधल्या आहेत, समजा जरी कंपनी बंद पडण्याचे झाले किंवा प्रचंड तोटा होण्याचा झाला तर काय सर्वच कंपन्या बुडतील का? नाही ना? मग ज्या दिसत आहे ते शेअर्स आरामात घेऊन ठेवा आणि त्याचा प्रचंड फायदा होतो.
★ आज ४ वर्षांनी भारती एअरटेल ची किंमत १९०० रुपये आहे.
★ आज ४ वर्षांनी एसबीआय ची किंमत ८१६ रुपये आहे.
★ आज ४ वर्षांनी बॉयोटेक ची किंमत ४५४ रुपये आहे.
★ आज ४ वर्षांनी व्ही आय ची किंमत ६ रुपये आहे.
★ आज ४ वर्षांनी सन फार्मा ची किंमत १६०० रुपये आहे.
हे वरील मी स्वतः घेतलेले शेअर्स आहे विनाकारण ताण न देता.
⁂ टिप्स ने घेतलेल्या अडाणी शेअर्स ची किंमत आज ५९३ रुपये आहे.
आयुष्य जगणे सोपे आहे ते कठीण करू नका, गुंतवणूक सोपी करा कारण तीच दीर्घ काळ चालणारी आणि वाढ होणारी असते. जरी शेअर मार्केट नसेल समजत तरीही सामान्य गुंतवणूक करून तुम्ही प्रचंड यशस्वी होऊ शकतात. विनाकारण इंट्राडे च्या मागे लागू नका नाहीतर अपघात होईल. वास्तव आयुष्य आहे, सिनेमा नाही. एकदा पैसा गेला कि गेलाच, तो परत मिळू शकत नाही.
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment