"काम-आयुष्य समतोलाचा सुवर्णमध्य : आनंदी मन, निरोगी जीवन!"

जगभरातील आणि भारतातील संशोधनानुसार, जास्त कामाचे तास मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, दरवर्षी ७४५,००० पेक्षा अधिक लोक दीर्घ काळ जास्त तास काम केल्यामुळे हृदयरोग व स्ट्रोकने मृत पावतात. तणाव, चिंता, निद्रानाश व 'बर्नआउट' सारख्या मानसिक समस्या वाढतात. भारतात तब्बल ८०% कर्मचारी मानसिक समस्यांना तोंड देत आहेत असे डेलॉइटच्या अभ्यासात आढळले. शारीरिक आरोग्यावर ही परिणाम दिसून येतात, जसे की हृदयरोगाचा धोका आणि अस्वास्थ्यदायक जीवनशैली. तज्ज्ञांच्या मते, आठवड्याचे ४८ तास मर्यादित ठेवणे, नियमित व्यायाम, संतुलित आहार व मानसिक आरोग्याच्या सहाय्याने आरोग्य सुधारता येते. आयुष्य अधिक स्वस्थ व उत्पादक ठेवण्यासाठी कामाचे तास कमी करणे गरजेचे आहे.


अश्विनीकुमार

 

Comments