युद्धात गेल्यावर जखमी झाल्याशिवाय कोणीही परत येत नाही
उद्योग व्यवसायात अपयशी झाल्याशिवाय कोणीही उद्योग व्यवसाय करू शकत नाही.
शेअर बाजारात तोटा झाल्याशिवाय कोणीही शेअर ट्रेडिंग करू शकत नाही.
आयुष्यात संकटे आणि समस्यांचा सामना केल्याशिवाय कोणीही जगू शकत नाही.
युद्धात जखमी होवून फक्त विजेता योद्धाच परत येतो.
उद्योग व्यवसायात अपयशी होवून फक्त यशस्वी उद्योजक व्यवसायिकच निर्माण होतो.
शेअर बाजारातील तोटा सहन केल्यानंतर यशस्वी शेअर ट्रेडर निर्माण होतो.
आयुष्यातील संकटे आणि समस्यांचा सामना करूनच सर्वांगीण समृद्ध आयुष्य निर्माण होते.
तुमचा श्वास सुरु आहे म्हणजे तुम्ही करू शकता.
गुडघे टेकले तर उभे रहा.
एकच आयुष्य भेटले आहे प्रत्येक संकटे आणि समस्यांचा सामना करून सक्षम व्हा ना कि हार माना.
तुम्ही जर आतापर्यंत जिवंत आहात म्हणजे तुम्ही आयुष्याची सर्वात मोठी लढाई जिंकत आला आहे ती म्हणजे सर्वाइव्ह होणे.
तुम्ही अगोदरच स्वतःला सिद्ध केले आहे आता मोठी झेप घ्या.
प्रचंड आत्मविश्वासाने उभे रहा आणि ह्या जगात तुमचे साम्राज्य उभे करा.
आराम पुरे झाला, स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी, सर्वांगीण समृद्धी साठी लढायला सुरुवात करा.
अश्विनीकुमार
#प्रोस्ताहन #प्रेरणा #अंतर्मनाचीशक्ती #आत्मविश्वास #आत्मविकास
Comments
Post a Comment