रेवती फर्नांडीस (नाव बदलले आहे) एका कांदिवली च्या रेफरन्स थ्रू माझ्या कडे आल्या, त्या मिडिया मध्ये उच्च पदावर होत्या पण लग्नानंतर कौटुंबिक आयुष्यासाठी त्यांनी अतिशय यशाच्या शिखरावर असलेले करिअर सोडून दिले. त्यांचे मिस्टर हे एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये क्वालिटी कंट्रोल मध्ये उच्च पदावर असल्यामुळे ते ३ ते ६, ८ महिने हे बाहेरगावी असतात. लग्नानंतर २ गोंडस मुले झाल्यानंतर त्यांनी ठरवले कि आपण परत सुरुवात करावी पण ह्या वेळेस नोकरी नको तर व्यवसाय सुरु करू आणि व्यवसाय देखील असा पाहिजे ज्यामध्ये लोकांना आनंद देवू शकू.
मार्केटिंग मेनेजर पर्यंत त्या पोहचल्या होत्या त्यानंतर त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांना नृत्याचा छंद होता, नृत्य एकप्रकारे त्यांचे उच्च आयामाशी जुळण्याचे एक साधन होते ज्यामध्ये त्या सर्व विसरून जायच्या व एका वेगळ्याच विश्वात जायच्या. त्यांचे आयामातील अनुभव ऐकायचो तेव्हा माझाच विश्वास बसत नव्हता कि जे ऋषी मुनी अनेक वर्षांची तपस्या करून अचिव्ह करायचे ते शहरातील काही लोकांना कसे काय शक्य होते?
रेवती ची आर्थिक परिस्थिती चांगली होती पण त्यापेक्षा महत्वाचे होते कि त्यांची मानसिक आणि अध्यात्मिक शक्ती, सोबत जागृत असलेली अलौकिक शक्ती. म्हणजे रेवती भले गरीब जरी असली असती तरी तिने अशीच प्रगती केली असती. यशाचा मार्ग सर्वांना एकसारखा असतो फक्त पोहचण्याची वेळ वेगळी होऊ शकते.
रेवतीला ना ध्यानाचा ना मानसशास्त्राचा कसलाही अनुभव नव्हता त्यामुळे जेव्हा कन्सल्ट करत होतो तेव्हा मला असे वाटले कि त्या तयार होणार नाही पण त्यांनी सुरुवात केली. रेवती ला सुरुवातीला काहीच समजत नव्हते, आमचे बोलणे देखील जुळत नव्हते तरीही रेवती प्रयत्न करत होती. असाच एक महिना गेला.
**हा खूप महत्वाचा पोइंट आहे. इथे मी सांगू इच्छितो कि आपल्याला कुठल्या मर्यादा ओलांडायला पाहिजे आणि सातत्य का ठेवले पाहिजे हे सांगतो, कारण ज्यांनी चमत्कार केले ते सातत्य ठेवायचे व कधीही हार मानत नव्हते, इथून पुढे तुम्हालाच पाउल टाकावे लागते जर टाकले तर जिंकलात नाही आणि नाही तर नाही.
रेवतीने स्वतहून निर्णय घेतला कि अजून पुढचे २ महिने प्रयत्न करू आणि इथे चमत्कार झाला, कारण परत कन्सल्ट झाले होते आणि काही सेशन्स मी बदलले होते जेणे करून रेवतीला आपण काय करत आहे आणि त्याचा रिझल्ट काय येतो ते समजायला लागले. रेवतीची शिकण्याची, विद्यार्थी बनण्याची मानसिकता जागृत झाली व तिने संपूर्णपने स्वतःला अर्पण करून टाकले.
** हा देखील महत्वाचा पोइंट आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतः देखील सराव करू शकता. रेवती ची सुरुवात विश्वासापासून केली. आणि चमत्कार झाला आणि रेवती सरळ चमत्कारिक रिझल्ट देवू लागली, पार्किंग मध्ये तिला जागा मिळू लागली, सेल मध्ये चांगल्या गोष्टी मिळायला लागल्या, तिला अशी ओळखीची लोक भेटायला लागली जी ती सुरु करत असलेल्या झुंबा क्लास बद्दल विचारू लागली.
पुढील सराव आम्ही आभार व्यक्त करण्याचा केला ज्यामध्ये रेवती जे जे आभार व्यक्त करायची जे भरभरून तिला मिळत होते आणि एकदा तर चमत्कार झाला कि तिच्या नवऱ्याला अचानक सुट्टी मिळाली आणि एक आठवड्यासाठी तो घरी आला. म्हणजे इथे देखील चमत्कार पण तिने नवऱ्याला सांगितले कि कुठलेही बाहेर जायचे कार्यक्रम करू नको कारण माझे सेशन सुरु आहेत आणि सरांनी सांगितले आहे पूर्ण झाल्या शिवाय सर्व कामे बंद फक्त इमर्जन्सी चालेल बाकी नाही. आणि नवरा देखील बोलला कि उत्तम आहे मला आराम देखील मिळेल आणि मुलांसोबत वेळ घालवता येईल.
पुढे अफर्मेशन घेतले ज्यामध्ये रेवती जी प्रार्थना करत होती त्याला ब्रम्हांड प्रतिसाद देत होता, माझा विश्वासच बसत नव्हता कि जिला आकर्षणाच्या सिद्धांताचे ज्ञान नाही, ध्यानाचे अ,ब,क,ड माहिती नाही, तार्किक माइंडसेट आणि सायकोलोजी चे ज्ञान नाही ती इतका चमत्कार कसा करू शकते? नाहीतर काही लोक सर मी ऱ्होंडा ब्रायन चे द सिक्रेट वाचले आहे, सर मी अमुक तमूक वाचले आहे असे बोलणारे जास्त आणि इथे जिला ऱ्होंडा ब्रायन चे, द सिक्रेट चे नाव माहित नसणारी इतका चमत्कार कसा करते?
व्हीज्यूअलाइझेशन सरावात रेवती ने उच्च पातळी गाठली. रेवती जे जे व्हीज्यूअलाइझ करायची ते ते वास्तवात येवू लागले. व्हीज्यूअलाइझ सरावात रेवती विविध आयामात प्रवास करू लागली, स्वप्नात स्वप्न बघू लागली आणि अतिशय वास्तव वाटेल असे आयुष्य जगू लागली, out of body experience झोपेत असतांना शरीराबाहेरील अनुभव घेवू लागली, देवांचे अनुभव आले, बुद्धांचा हिलिंग हात दिसला आणि चमत्कार काही आजार लगेच बरे झाले. हे सर्व प्रचंड शक्तिशाली अनुभव असतात खूप म्हणजे खूपच कमी लोकांना इतक्या लवकर अनुभव येतात आणि जे अनुभव सांभाळू शकत नाही ते विविध मानसिक आजारांनी ग्रस्त होतात किंवा वेडे होतात.
दुसरा महिना तर चमत्कारामध्ये गेला आणि ह्यासोबत रेवतीला पाहिजे तशी जागा देखील झुंबा क्लास साठी मिळाली, रेवतीने सेटअप उत्तम केला व रेवतीची मानसिकता देखील बदललेली होती. रेवतीला मानसशास्त्र, अंतर्मन, कंपन, ब्रम्हांड, देव दानव, सकारात्मक नकारात्मक उर्जा असे सर्व विषय समजायला लागले आणि रेवती त्यांचा वापर कसा करून घ्यायचा हे समजायला लागली. रेवतीचा औरा हा शक्तिशाली झाला, रेवतीच्या चेहऱ्यावर वेगळाच ग्लो आला, तिच्या डोळ्यात एक चमक आली, रेवती आजू बाजूचे वातावरण कंट्रोल करू शकत होती म्हणजे रेवती जिथे जायची तिथे प्रचंड सकारात्मकता निर्माण व्हायची.
तिसरा महिना हा पूर्ण जोशात सुरु झाला, ओम मंत्रा आणि इतर गरजेच्या मंत्रांचा सराव सुरु झाला. एक वेगळेच विश्व रेवतीने दाखवून दिले. ओम मंत्रा रेवतीची कंपने स्वप्ने प्रचंड प्रमाणात सक्षम करत होते, रेवतीची कंपने हि जाणवून यायची इतकी शक्तिशाली होत गेली जसे शिवाच्या काली मातेच्या मंदिरात गेल्यावर जाणवते अगदी तसेच. इथे आमचा सराव उच्च स्तरावर गेला आणि दुसरीकडे रेवतीच्या क्लासेस ला लोक यायला लागली, आणि अशी लोक येत होती जी इतकी सक्षम होती कि त्यांच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहचली, अगदी २ तास प्रवास करून देखील लोक यायला लागले.
पहिल्या एडमिशन मध्ये ३ महिन्यांचे भाडे निघून गेले, सर्व प्रकारची सक्षम लोक यायला लागली. जशी लोक एडमिशन घ्यायची आणि आता रेवतीला त्यांची उर्जा, कंपने आणि सकारात्मक नकारात्मक उर्जा समजायला लागली. एक सक्षम कंपने असलेली व्यक्ती देखील आली जे नाही व्हायला पाहिजे होते ते झाले कारण त्या व्यक्तीची कंपने जास्तच सक्षम होती पण रेवतीने लगेच सांभाळले व पुढील प्रवास सुरु केला. रेवतीने ज्या टप्प्यावर तिचे करिअर सोडले होते अगदी त्याच टप्प्यावर ती परत पोहचली होती.
ह्या जगात फक्त आपणच राहत नाही, ८ अब्ज लोक राहतात आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये क्षमता आहे. ती व्यक्ती आपल्यापेक्षा कमजोर कंपनाची असू शकते किंवा आपल्या पेक्षा शक्तिशाली कंपनाची, त्यामुळे जर आपण कधी कधी शक्तिशाली कंपनापुढे कमजोर वाटलो तर त्याला मनाला लावून घेवू नका. समजूतदार वास्तववादी मानसिकता ठेवा ना कि लहान मुलासारखे. चांगले आणि वाईट देखील असतात हे मान्य करा आणि प्रत्येक व्यक्ती त्याच्या प्रमाणे आयुष्य जगते आणि तुम्हाला तुमच्याप्रमाणे आयुष्य जगायचे आहे. जजमेंट नको आणि आपापले आयुष्य जगू द्यायचे. पटत नाही वगैरे लहान मुलांसारखे वागणे नको.
चमत्कार सांगून नाही तर असे घडतात, आणि मी ह्या अनुभवाचा विचारच केला नव्हता. अशक्याचे शक्य झाले होते नाहीतर सर्वसाधारण अश्या लेव्हल ला पोहचायला कमीत कमी १ वर्ष व जास्तीत जास्त ३ वर्षे व त्यापुढील कालावधी लागतो प्रत्येक व्यक्तीनुसार. रेवतीने चमत्कार केला तो मला अपेक्षित नव्हता पण चमत्कार तेव्हाच होतो ना कि जेव्हा तुम्हाला माहिती असते तेव्हा. परीक्षेत कॉपी करून पास होऊ शकतात, वास्तव आयुष्यात नाही.
खरच सोपे आहे, स्वतःवर विश्वास ठेवा, ब्रम्हांडावर विश्वास ठेवा आणि चमत्कार बघा, तुम्ही तुम्हाला जसे पाहिजे तसे आयुष्य आकर्षित करून जगायला लागाल.
लेख पूर्ण वाचल्यामुले मी तुमचे आभार मानत आहे, ब्रम्हांड तुम्हाला तुमचे स्वप्नांचे आयुष्य वास्तवात जागवून देईल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत कोच
#आकर्षणाचासिद्धांत #झुंबाक्लास #गृहिणी #स्त्रीशक्ती #विवाहितस्त्री

Comments
Post a Comment