गावात एक शेतकरी राहत होता जो दूधापासून दही आणि लोणी तयार करून विकत होता.
त्याचे जीवन साधे होते आणि मेहनत ही त्याची ओळख होती.
एके दिवशी त्याच्या बायकोने लोणी तयार करून दिले. त्या लोण्याचा गोळा बनविला
गेला. प्रत्येक लोण्याचा गोळा सुमारे एक किलोचा होता. शेतकरी तो लोण्याचा गोळा
घेऊन शहराच्या दिशेने निघाला.
शहरात पोहचल्यावर त्याने नेहमीप्रमाणे लोणी एका दुकानदाराला विकले आणि
त्याच्या बदल्यात चहा पावडर, साखर, तेल आणि साबण घेऊन परत घरी आला.
शेतकरी गेल्यानंतर दुकानदाराने लोणी फ्रिजमध्ये ठेवायला सुरुवात केली.
त्यावेळी त्याच्या मनात विचार आला, "का नको प्रत्येक लोण्याच्या गोळ्याचे वजन
तपासावे?"
जेव्हा त्याने लोण्याचा गोळा वजन काट्यावर ठेवला, तेव्हा लोण्याच्या गोळा
फक्त 900 ग्राम वजनाचा निघाला. त्याला विश्वास बसला नाही. त्याने उरलेल्या लोण्याच्या
गोळ्यांचे देखील वजन केले, पण प्रत्येकाचे वजन 900 ग्रामच होते.
आता त्याच्या मनात राग आणि निराशा भरली. त्याला वाटले की शेतकऱ्याने त्याला
फसवले आहे.
पुढच्या आठवड्यात जेव्हा शेतकरी परत लोणी घेऊन आला, तेव्हा दुकानदार प्रचंड राग
आला. त्याने शेतकऱ्याला बघताच सांगितले, "आता येथे येण्याची आवश्यकता
नाही. मला बेईमानी करणाऱ्यांशी व्यवहार करत नाही."
शेतकऱ्याने शांतपणे त्याचे शब्द ऐकले आणि मोठ्या विनम्रतेने उत्तर दिले,
"मी गरीब आहे, माझ्याकडे वजन काटा नाही. जे एक किलो साखर मी तुमच्याकडून
घेतो, तेच मी वजनावर ठेवून त्याच वजनाचे लोणी तयार करतो."
हे ऐकून दुकानदार काही क्षणांसाठी शांत झाला, कारण त्याला समजले की चूक गरीब
शेतकऱ्याची नाही, तर ती त्याची स्वतःची होती.
या छोट्याशा गोष्टीत एक आयुष्याची मोठी शिकवण दडलेली आहे: जे आपण इतरांना देतो,
ते कधी ना कधी
आपल्या कडेच परत येतो, ते कधी सन्मान असो, व्यवहार असो किंवा फसवणूक असो.
जे पेराल तेच उगवेल, आंब्याचे बी पेरले तर फणसाचे झाड नाही उगवणार.
धन्यवाद
अश्विनीकुमार
Comments
Post a Comment