(नाव बदलले आहे)
एका मालवाहू जहाजाचा कॅप्टन त्याची बायको
अनेक वर्षांपासून माझी फोलोवर होती आणि तिने माझे अनेक कोर्सेस केले होते. विविध
भावनिक वादळातून तिने स्वतःला स्थिर ठेवत आपले आयुष्य स्थिर ठेवले होते. माझी
त्यांच्या मिस्टरांना भेटायची इच्छा होती पण ते शिप वर असल्यामुळे सहसा शक्य होत
नव्हते. आमचे कधीही बोलणे देखील झाले नव्हते इतके ते व्यस्त असायचे.
एक वैयक्तिक कारण होते त्यामुळे त्यांच्या मिस्टरांना प्रचंड नैराश्य आले होते.
त्यांच्या बहिणीचे पर धर्मीय मुलासोबत प्रेम संबंध होते व तो मुलगा अगोदर पासून
विवाहित होता आणि तरी देखील त्यांची बहिण त्या मुलासोबत विना लग्नाची रहायला तयार
झाली होती व राहत होती.
कॅप्टन चे नाव आपण जयेश
पकडू, जयेश ने त्याच्या भावना माझ्याकडे व्यक्त
केल्या होत्या, त्या अगोदर जयेशला ह्या गोष्टी कश्या सांगू हे समजत नव्हते. तीन
महिने सतत तो मला वेळ मागायचा पण व्यक्त होऊ शकत नव्हता पण जेव्हा त्याने सांगायला
सुरुवात केली तेव्हा जयेश ला अनेकदा रडायला येत होते, कारण त्याने त्याच्या
बहिणीला अत्यंत प्रेमाने वाढवले होते व सर्व सुख दिले होते.
जयेश कडे शिप वर जाण्या
अगोदर फक्त तीन महिने होते आणि ह्यामध्ये एक जास्त पगाराच नोकरी आली होती व जयेश
चे स्वप्न उद्योग किंवा व्यवसाय करायचे होते ज्यामध्ये त्याचा एक दक्षिण भारतीय
मित्र जो शेती करतो तो त्याला कर्नाटकात बोलत होता ज्यामध्ये शेती संबंधी मशीन,
उत्पादने आणि होलसेल धान्य विक्री संदर्भात संधी होती.
जयेश निराश झाला होता व
त्याने माझ्याकडे येण्याअगोदर जवळपास निश्चित केले होते कि शिप वर जायचे पण जेव्हा
आमचे सर्व सेशन्स आणि कोर्स संपत आले तसे जयेश मध्ये प्रगती दिसून आली, आणि जयेशने
पूर्ण झेप घेतली. जयेशची बहिण काही दिवसांकरिता घरी आली होती तिला जयेश ने घरी
घेतले नाही, आणि संबंध तोडून टाकले
कारण लहान मुलगी नव्हती ती आणि त्याच्या मुलीवर नकारात्मक संस्कार झाले असते
म्हणून कडक नाही तर योग्य निर्णय घेतला.
एका ठिकाणी जयेश आणि माझे
एकमत होत नव्हते ते म्हणजे नोकरी सोडून व्यवसायात उतरावे म्हणून. आमचे अनेकदा
डिस्कशन झाले आणि मला काही जयेश चा निर्णय पटत नव्हता. शेवटी जय्शे बोलला सर फक्त
१ वर्ष करून बघतो आणि नाही शक्य झाले तर परत कामावर रुजू होतो. मी मान्यता दिली
आणि पुढे अनेक गोष्टी बदलत गेल्या.
जसे एक वर्ष सरत जात होते
तसे जयेश हा व्यवसायात पारंगत होत होता. आणि त्या अगोदरच जयेशने राजीनामा टाकला
होता हे मला माहिती नव्हते. आणि नेमकी त्या कंपनीचे जहाज खाडी देशात चाललेल्या
तणावात अडकून पडले व जयेश मोठ्या संकटातून वाचला होता कारण त्याने असे अनेक किस्से
सांगितले होते कि कसे कंपनी जहाजातील कर्मचाऱ्यांना वार्यावर सोडते ते.
आज जयेश आणि त्याचे
कुटुंब अतिशय सुखी आणि समृद्धी आयुष्य जगत आहेत. त्यांची एक नकारात्मक बहिण बाजूला
गेली आणि त्याजागी चार सकारात्मक मानलेल्या बहिणी त्यांच्या आयुष्यात ह्या
व्यवसायाच्या मार्गाने आल्या आणि सोबत त्या चार बहिणींच्या कुटुंबांनी जयेशला
त्यांचा मुलगा मानले.
ब्रम्हांड जयेश ला कसे
संकेत देत होता?
जयेश चे आकर्षणाच्या
सिद्धांताचे कोर्सेस आणि उपाय सुरु होते. जयेश जेव्हा झोपायचे तेव्हा त्याला गाढ
झोपेत संकेत पडायचे देवी लक्ष्मी सोन्याचे नाने पाडत चालली आहे व जयेश ती नाणी
उचलत देवी लक्ष्मी च्या मागे जात आहे. व एका ठिकाणी जावून देवी लक्ष्मी लुप्त होत
आहे.
असेच काही दिवस गेले
त्याच्या मित्राचा फोन आला कि त्याला काही लाखांची गरज आहे व्यवसायासाठी, जयेश ने
होकार दिला पण मित्र बोलला कि तू इथे ये, काही दिवस थांब
आणि पैश्यांसोबत मला देखील मदत कर.
जयेश ने बायकोशी चर्चा
केली आणि मुलांसोबत देखील बोलला व सर्व तयार झाले. जयेश मित्राच्या घरी जायला
निघाला. प्रवास करतांना त्याला असे जाणवत होते कि हा प्रवास त्याने अगोदर केला आहे
पण कधी? असाच प्रवास करतांना व इंजोय करतांना जयेश ला
क्लिक झाले कि देवी लक्ष्मी च्या मागे जात असतांना त्याने हा प्रवास केला आहे अगदी
हुबेहूब. हे प्रवासाचे आयुष्य जयेश अनेकदा जगला आहे त्यामुळे त्याने जी डीटेलिंग
एड केली अगदी तसेच घडत होते.
आणि जेव्हा तो तिथे
पोहचला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला, कारण जिथे देवी लक्ष्मी ने प्रवास
संपवला होता तिथे जयेश येवून पोहचला होता. ज्यांना ब्रम्हांडाने दिले त्यांचे
व्हीज्यूअलाइझेशन अगदी हुबेहूब होते, एक टक्का कुठेही चूक नव्हते आणि त्यांनी
त्यांना जे पाहिजे ते अमर्याद किंवा मर्यादित आकर्षित केले होते.
जयेश चा मित्र एक ऑफिस
मध्ये घेऊन गेला पेपर वर्क साठी, जयेश ला वाटले
कि मित्राने पैसे घेतले असा पुरावा राहवा म्हणून तो तिथे आला तेव्हा जयेशने विचार
केला कि ह्या अगोदर सुद्धा मी ह्याला पैसे उधार दिले आहे आणि त्याने पूर्ण परत
दिले आहे मग आता इथे का आलो आहोत आम्ही?
जयेश चा मित्र त्याच्या
नावाने कंपनी सुरु करतो व त्याला ते पैसे तिथे टाकायला लावतो. आणि जयेश ला काही
दिवस काम सांभाळायला सांगतो. जयेश तसे करतो आणि जस जसे दिवस जातात तस तसे जयेश ला
व्यवसाय समजायला लागतो व तो आता स्वतःहून व्यवसाय करायला लागतो ते देखील अनेक
वर्षांचा अनुभव असल्यासारखा.
जयेश च्या मित्राला पैसे
पाहिजे होते पण सोबत तो जे पैसे घेणार होता त्यामध्ये आरामात एक नवीन व्यवसाय सुरु
होवून मित्राला मदत देखील झाली असती म्हणून जयेश ने हा निर्णय घेतला. आणि जयेश त्या व्यवसायातून काही दिवसात नफा
काढू लागला. आता जयेश चे जुने आयुष्य ओव्हर आणि नवीन आयुष्य सुरु झाले आहे.
जयेश ने वापरलेल्या
आकर्षणाच्या सिद्धांताच्या टेक्निक्स :
तुम्हाला वाटत असेल कि मी काही नवीन सांगणार आहे तसे काही नाही, ज्या टेक्निक्स आहेत त्याच वापरल्या गेल्या, थोडा फार माझ्या पद्धतीने मी बदल केला गेला आहे बाकी काही नाही. त्यामुळे अति विचार करू नका.
१) उपचारासाठी ध्यान
साधना
२) उपचार आणि
रीप्रोग्रमिंग साठी संमोहन शास्त्र
३) दिवसभर सकारात्मक
विचार करणे
४) आभार व्यक्त करणे
५) आकर्षित झाले आहे
असे समजून ब्रम्हांडाचे आभार मानणे
६) व्हीज्यूअलाइझ
करणे सूक्ष्म च्या सूक्ष्म डीटेल्स वापरून
७) अध्यात्मिक कंपने
सक्षम करणे
८) व्यायाम करणे
९) घरचा नेहमीचा
आहार जास्तीत जास्त घेणे
१०) सातत्य ठेवणे
हे सर्व टेक्निक्स
प्रत्यक्षात करवून घेतल्या आहेत. आणि आश्चर्य म्हणजे ज्यासाठी ६ महिने लागतात तिथे
जयेश ने एका महिन्यात सर्व टेक्निक्स विथ प्रात्यक्षिक शिकले. ह्यामुळे मी नाही तर
म्हण देखील खरी आहे कि जर तुम्ही ठरवले तर तुम्ही पाहिजे ते करू शकता. म्हणी
वास्तवात उतरतांना बघितले आहेत.
सोबत जाता जाता काही
धोक्याच्या सूचना देखील देवून जात आहे कारण प्रत्येकाचे आयुष्य वेगवेगळे असते आणि
आजू बाजूची लोक आणि परिस्थिती सुद्धा, कृपया त्या फोलोव कराल नाहीतर विनाकारण
आकर्षणाचा सिद्धांत काम करत नाही म्हणून खडे फोडाल.
जयेश च्या आजू बाजूचे वातावरण जास्त प्रमाणात सकारात्मक होते व जयेशची आर्थिक परिस्थिती देखील उत्तम होती. तुम्हाला तुमच्या आजूबाजूची परिस्थिती आणि लोक तपासावी लागतील नाहीतर आंधळा विश्वास खूप घातक ठरू शकतो. आकर्षणाचा सिद्धांत भावनिक आंधळा नाही आहे. थोडक्यात उदाहरण खाली देत आहे ती वाचाल.
- एक व्यक्ती बाहेरगावी काम करत होती आणि त्याच्या बायकोचे त्याच्या मित्र सोबत अनैतिक संबंध होते.
- एका स्त्री चा नवरा बाहेरगावी काम करत होता व त्या नवऱ्यामुळे तिला गुप्त रोग झाले आणि नवऱ्याच्या बाहेरख्यालीपणामुळे सीव्हीयर डिप्रेशन आले, विश्वास तुटला.
- मित्राला विश्वास ठेवून पैसे उधार दिले ते परत आले नाही आणि वेळेवर घराचा हफ्ता न भरल्यामुळे घरावर जप्ती आली सोबत डिप्रेशन आले व हाताची नोकरी सुटली.
शहाण्याला शब्दाचा मार.
नाण्याच्या दोन बाजू असतात.
धन्यवाद
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

Comments
Post a Comment